पोस्ट्स

जून, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हिजड्यांच्या गावात हरवलोय...

हिजड्यांच्या गावात हरवलोय... पुर्ण लिंगाच्या पुरषी आखाड्यात भरणार्‍या लाखो कुस्त्याचा प्रेक्षक होता होता रस्ता चुकलोय... इथ पोट भरायला अपुरे आहेत भाकराचे तुकडे, मर्दानीला तोंडी लागतात चुरगळणारे लचके बाजारही भरतो तो उपासमारीच्या गांध्यांना खाजवणार्‍या, वासनेच्या साखळदंडाने जखडलेल्या 'भोगवस्तुंचा' त्यांच्या किंचाळण्याला आवाजच नाही चामड्याला वेदना अन् देहाला किंमत काहीच नाही... घरात, घराबाहेर, धर्मस्थळांत, धर्मस्थळाबाहेर, शाळेत, शाळेबाहेर, खाजगीजागेवर, सार्वजणिक रानात उडताहेत फवारे अर्धमेल्या विर्याचे कितीही नमन करा आर्याचे जळीतकांड होणारच 'भोगवस्तुची' राख होणारच रक्षाविसर्जनही होत ते दलालांच्या दलदलितच... माडींत लिंग कुजवणार्‍या हिजड्यांच्या गावात हरवलोय... मिशीवर ताव मारणार्‍या शण्डाच्या वस्तीत हरवलोय... माझ पुरुषत्व संपण्याच्या आधी, ह्या हिजड्यांसारखा शण्ड होण्याआधी नव गाव दिसु दे...

मुर्तिभंजक

हे मुर्तिभंजका परत ये परत ये सहानुभुतीची कुर्‍हाड घेवुन कमरेत वाकलेल्या, चेहर्‍यात लाचारलेल्या अन् देहाने थकलेल्या बळीराजाची मुर्ति भंगायला.... हे मुर्तिभंजका परत ये परत ये सुडाची तलवार घेवुन पोटाने पुढारलेल्या, मनाने निर्मम एका हाताने सलाम अन् दुसर्‍याने हलाल करणार्‍या श्वेतवस्त्रधारित रानट्यांची मुर्ती भंगायला.... हे मुर्तिभंजका परत ये परत ये सद्बुद्धीचा सुरा घेवुन डोळ्याने आंधळ्या, कानाने बहिर्‍या, तोंडाने मुक्या अन् स्पर्शाने बधीर असलेल्यांची हतबल मुर्ती भंगायला अन् निघुन जा कायमचाच आता मुर्तिकारका तु ये काळ्या कठीण पाषाणासवेत लाथ मारेल तिथ पाणी काढणार्‍या, लाथाडल तर चिरडणार्‍या मग बांध बळीराजाच्या मुर्त्या मुर्तिकारका पुन्हा ये पांढर्‍या ठिसुळ दगडासवेत रंगाप्रमाणे शुद्ध रहाणार्‍या, डाग पडताच चुरा होणार्‍या मग बांध श्वेतवस्त्रधारितांच्या मुर्त्या मुर्तिकारका पुन्हा ये तांबड्या पत्थरासवेत मरणार्‍याला रक्त देणार्‍या, मारणार्‍याचे रक्त काढणारर्‍या मग बांध संवेदनशील मुर्त्या शेवटी प्राणदेवता तु ये अन् जीव टाक त्या मुर्त्यांमध्ये कोणताही भेदभाव न करता

क्रांती

गर्जा जय जयकार क्रांतीचा गर्जा जय जयकार कुसुमाग्रजांच्या सुंदर ओळी ... पण खरच कधी गरजला क्रांतीचा जयघोष ह्या भुमीत? झाल्या त्या बर्‍याचश्या घोषणा व थोड्याश्या कृत्या उठावाच्या अन् बंडाच्या. वैज्ञानिक क्रांत्या झाल्या असतिलही पण राजसत्ता उलथुन टाकणार्‍या क्रांत्या कधी झाल्याच नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यासाठी केले गेलेले उठाव असो किंवा स्वातंत्र्योत्तर काळात झालेली असंतोषजनक आंदोलने मग ते जेपीपासुन ते अगदी आण्णा हजारेंपर्यंत असो ही क्रांतीच्या कोणत्याच परिभाषेत बसत नाहीत. कारण खर तर ह्या उठावामुळे किंवा आंदोलनामुळे कोणतीच राजसत्ता उद्वस्त झाली नाही ना नव्या राजसत्तेने, लोकसत्ते श्वास घेतला. स्वातंत्र्यपूर्व उठावामुळे ब्रिटीश राजवट संपुष्टात आली असली, लोकशाहीची बिजे रोवली गेली असतीलही पण नवीन राजवट, राजसत्ता किंबहुना तत्तकालीन बुद्धीजीवींना अभिप्रेत अशी व्यवस्था अस्तित्वात आली अस म्हणणे हे सुर्यास्तावेळी सुर्यनमस्कार करण्याइतक अतिउत्साहाच अन् तितकच बालिशपणाच ठरेल. केवळ एखादी व्यवस्था मोडुन काढण म्हणजे क्रांती नव्हे तर त्या व्यवस्थेला पर्यायी अन् तत्कालीन क्रांतीकारकांनी स

प्रारब्ध

इमेज
प्रारब्धाचा अनन्वयार्थ काढता काढता, वर्तमानाचा गुंता करून टाकतो हा देह नखशिकांत दारिद्रच्या जखमा बाळगणारा.. जमिनीच्या आट्यांच्या अन् पावलाच्या भेगांच्या मिलनाचा सोहोळा म्हणजे आसवांच्या अक्षदा अन् उपासमारीच्या बैठका.. आश्वासनाच्या गर्दीत संवेदनशिलता हरवते अन् उरते ते फक्त चालते-फिरते बुजगावने, शेतात फाटक आभाळ बघनारे मतदान केंद्राबाहेर रांगा लावनारे, जल्लोश यात्रेत गुलाल उडवनारे, अन् रात्री इमानदारीच्या गुलामगिरिची फळे नुसतिच चाटनारे... मग मातिची उरली-सुरली नाळ तोडताना विकासाच्या ओवी गातो कस्तूरीमृगाच रूप घेतलेला मारिच, अपहरण होत ते कुरतडलेल्या काळीजाच, हाती रहात ते शांत लटकलेल बुजगावन, अन् प्रारब्ध मागच्या जन्माच व ह्या जन्माच, पुढच्या जन्मासाठी..