घर
एक स्वप्न
घाम गाळणाय्रांसाठी,
रक्ताचे शिंतोडे उडवणाय्रांसाठी…
जीवनची इंद्रीये विकून,
उरलीसुरली अवयवे भाड्याने देऊन
वसवलेल स्वतःच घर
जणु कबीरची नगरीचं....
शेवटी स्वप्नांना आशेचा किरण भेटतो…
स्वप्न सत्यात उतरलली दिसतात
पण.....
शेवटी तोच क्ष-किरण बनून
स्वप्नांना छेदून दूर अनंतात जातो
कोणत्याही अडथ्ळ्यशिवाय.....
अन् इमारत कोसळ्ते.....
त्यांच्या अस्तित्वाचा साधा पुरावही
उरत नाही,
उरतो तो कोंद्ट घोषणांचा उच्छाद,,,,
आमच्याकडे असतो तो एक शोकांकित श्वास,
सांत्वनात गुंतलेल मन,
एका मिनिटच्या विनोदनं स्थिरस्थावर होणार...
अन् ज्यांच्याकडे काही नसत,
त्यांच मन हिजड झालेल असत..

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा