पाऊस


आज पाऊस पडला..
आजारपणातही जीव मेघगर्जनेत चिंब भिजला
आठवणीचा झरा पुन्हा ओसांडला..
आणि आठवणीत तू नसशील तर आठवणीची व्याख्याच चुकीची ना?

चर्‍हट्याने बांधलेल्या मनाला मग मी मोकळ केल 
भेगाळलेल्या पावलांना वेडावलेल मन दूर दूर घेवून गेल
प्रत्येक आठवणीतली तुझी प्रतिमा संजीवनीच,
माझ्या मुडदूसावलेल्या देहासाठी
तुझा स्पर्शाच्या जाणीवेने शहाराच आणला
विरहाच्या प्रस्थापित दुःखाला धक्काच बसला..
त्याच्या जखमांवर मलमपट्टी करणच सोडलंय
तुझ्याबरोबरचे क्षणच खपली बनतात

पाऊसाच्या वाढत्या वेगाबरोबर मन बागडल बेफाम
गुलमोहराच्या रंगात रंगल ज्याला पाठ टेकून आपण रंगवायचो स्वप्न
अन ज्या तलावाकाठी आपण हरवायचो एकमेकांत त्यात डुपक्या लावल्या असंख्य
मग शेवटी वरुणराजा थकला..
नाचणाऱ्या मोर बरोबर मनही शांत झाल
आता पुन्हा तोच विरह तोच एकटेपणा
पण विरह हा तर प्रेमाचा सांकेतिक शब्द!
हा शब्द नीट पार करूया
ह्याला वाटणी नाही
त्याला आठवणीची जोडणी देऊया ….
प्रेम हे मिळणारच ….
अश्वस्थामाबरोबर अमर असलेली दुसरी गोष्ट म्हणजे प्रेम
त्याला तो शाप आहे
आणि प्रेमाला … वरदान

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हम इंसान बन गये..

It's not good bye.. It's see you later..

Atheist having spiritual experience