महाराष्ट्रदिन



राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा
प्रणाम घ्यावा माझा जय श्री महाराष्ट्र देशा
आज तुझा छप्पन्नावा वाढदिवस, निदान आज तरी नकारार्थी बोलायला नको. पण चिंतन नक्की करायला हव.
महाराष्ट्रा, तु, विविधतेने नटलेल्या भारतातील एक वैभवशाली राज्य. ज्याचा भूतकाळ महासागराच्या खोलीहून अधिक खोल पण तितकाच ज्वलंत. मोघलाईत पोळणार्‍या उन्हाला, ठेचकाळणार्‍या सह्याद्रीला अन् पिसाळलेळ्या मुघालाला न जुमाणता लढाया करणार्‍यांपासून, गुलामगिरीत लाचारीच्या भाकरीला लाथाडुन बलिदान देणार्‍यांपासून ते तुझ्या निर्मितीच्या रक्तरंजित इतिहासात रक्त सांडणार्‍यांपर्यंत सर्वांचाच तुला अभिमान आहे, माहितेय. पण नंतरच्या काळातही तुझ्या नावाच्या जयघोष सातासमुद्रांपार निनादल. सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर, लता मंगेशकर यांनी तर आपापल्या क्षेत्रात वेगळाच ठसा उमठवला. पण बाकीच्यांनीही तुझ नाव सुवर्ण अक्षरांनी कोरल.
वयाच्या ऐकोणिसाव्या वर्षी एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी कृष्णा पाटिल, दुचाकी निर्मितीतला जादुगार वर्डे यांनी स्वतःच वेगळ नाव तयार केल.
अस म्हणतात की मराठी माणसाला, तुझ्या भुमीत जन्माला येणार्‍याला व्यवसाय करता येत नाही. पण सिटि संघाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पंडित, कामत हॉटेलचे संस्थापक विठ्ठ्ल कामत, टाटा मोटरची पहिली महिला कामगार आणि सुधा मुर्ती संघाच्या संस्थापिका सुधा कुलकर्णी-मुर्ती, हिंदुस्तान युनिलिव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन परांजपे यांनी दाखवुन दिल की तुझ्या भुमीत जन्म घेणारे कशातच कमी नाहीत. अशी खुपशी उदाहरणे आहेत ज्यांनी व्यवसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी तर ‘Industrial township’ म्हणजे काय हे भारतात पहिल्यांदा शिकवल. चित्रपटसृष्टी तर मराठी माणसानेच जन्माला घातली. संगीत क्षेत्र, कला क्षेत्र या सर्वच क्षेत्रात तुझा गौरव केला.
पण येवढ्यावरच थांबायच नाही. अजुन खूप काही करायच आहे. आज तुझी पोर मंगळावर पोहोचली. पण त्याच वेळी तुझ्या काही पोरांना मंगळ पाचविलाच पुजलाय. अजुन शेतकरी आत्महत्या करतोय. कामगारांची अजुनही पिळवणूक होतेय. आता त्यांनाही एकत्र करायच आहे. लढायच आहे. सळसळत रक्त तर जन्मापासुनच नसानसात दौडतय. आता फक्त त्याचा योग्य ठिकाणी वापर करायचा आहे. आणि तुझ्या नावाची गर्जना दशदिशांत अशीच दुमदुमू द्यायची आहे.
अन् जेव्हा कधीही वेळ येईल तेव्हा आमच्या कतृत्वामुळे पुन्हा लोक म्हणतिल की,
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा .
जयस्तु महाराष्ट्र देशा

महाराष्ट्रात राहणार्‍या प्रत्येक नागरिकास महाराष्ट्रदिनाच्या आणि जागतिक कामगारदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हम इंसान बन गये..

It's not good bye.. It's see you later..

Atheist having spiritual experience