संस्कृतीरक्षक

प्रेमाच्या पाखराची पिसे उपटून,
त्याच्या विव्हळण्यावर हसणारे, 'संस्कृतीरक्षक',
हे ना तर विष्णूचे अवतार,
ना पैगंबरांचे वारसदार
हे तर भ्याड संस्कृतीतले नग्न पुतळे

हे पुतळे श्वास घेतात,
हालचालही करतात,
खातातही पण,
प्रेमआंधळ्या रोग्यांचे शोक

हिंसा, भय, हुकुमत एवढाच त्यांचा शब्दकोश,
हिंसा करून भयभितांवर गाजवायची हुकुमत
त्यांचा मड्यावर थाटायची चूल,
अन् करायचा शाकाहार मांसाचा

प्रेमाला इतक केलाय संकुचित
की ते अदृश्यच झालय
सगळ्यांनीच काळजी घेतलीय
नवी प्रेमकथा न होण्याची
लिहिणाऱ्याचे हात छाटायचे,
बोलणाऱ्याची जीभ,
अन् करणाऱ्याला द्यायचा मृत्यूदंड …

आता प्रतीक्षा आहे कलिची
ह्या कलियुगाचा कलि,
जो जन्म घेतो प्रेमातूनच
म्हणून प्रेम तर करावच लागेल….

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हम इंसान बन गये..

It's not good bye.. It's see you later..

Atheist having spiritual experience