@ 5th May, Karl Marx's Birthday



असंख्य, बंदिस्त पाखरांना मुक्तीचा संदेश
देणार्‍या
त्यांच्या पंखांना सशस्त्र क्रांतीचे बळ देणार्‍या
देवदूताने आज पहिला श्वास घेतला
ह्या भिन्नतेच्या प्रदुषित समाजात
,
पण हे देवदूता
, शेकडो वर्षे झाली,
तरीही तुझा अग्रदूत आजही
भुकेलेल्या कारखानदारांना
,
आसुसलेल्या सावकारांना
स्वतःच्या मांसाचे लचके
स्वतःच्याच नखाने ओरखडून
दाखवतोय नैवेद्य घोषणांसह
,
अन् मोबदल्याच्या भिकेच्या भाकरावरच
मायच तेराव उरकतो.
चिरफाड करणार्‍या हाताचा रंगही हिरवा
,
विकासाचा
, भरभराटीचा प्रतिक !
असला विकास कोणत्या
सावरकर-आंबेडकर-गांधी-नेहरुंना
अभिप्रेत होता कुणास ठाऊक
?
आमिर खानच्या तात्विक
, सुखद अंताच्या
चलचित्रात रमणारा तुझा नेता
,
कधीच सुखावला नाही तुझ्या स्वप्नात
,
तुझ स्वप्न – संग्रह
, वास्तवाच्या चलचित्रांचा,
तुझ्या नजरेतला समाज
कधी स्वप्नाळला नाही कोणीच
.
पाचवीला पुजलेल्या अन् हाता-गळ्यात अडकवलेल्या
जातीच्या गंड्या-दोर्‍यांना सोडवलच नाही
,
मग वर्गसंघर्षांची पहिली पायरी दिसणार तर कशी
?
कोसोदुर असलेल्या शोषितांच्या डबक्यांतच
तुझा राजा गुंतलाय
,
तुझ
materialistic dielectric च तत्व
कधी येणार अस्तित्वात
?
त्यातून सावरायला घेशील का पुन्हा जन्म
?
माहितेय
, नाही तुझा विश्वास ह्यावर,
पण तुझी तत्वे बदलण्याचा
, कृतीत आणण्याचा
अधिकार तु
झाच ना! 
तत्वातूनच घे ना पुर्नजन्म
,
कारण तुझ्या त्या नव्या श्वासाची
असंख्य
, सजीव जीवश्म वाट बघताहेत
कारण ह्या आंधळ्या धृतराष्ट्राला
समाधान मानाव अस काहीच उरणार नाही
,
पुन्हा एकदा !!!  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हम इंसान बन गये..

It's not good bye.. It's see you later..

Atheist having spiritual experience