प्रारब्ध

प्रारब्धाचा अनन्वयार्थ काढता काढता,
वर्तमानाचा गुंता करून टाकतो हा देह
नखशिकांत दारिद्रच्या जखमा बाळगणारा..
जमिनीच्या आट्यांच्या अन् पावलाच्या भेगांच्या मिलनाचा सोहोळा
म्हणजे आसवांच्या अक्षदा
अन् उपासमारीच्या बैठका..
आश्वासनाच्या गर्दीत
संवेदनशिलता हरवते
अन् उरते ते फक्त चालते-फिरते बुजगावने,
शेतात फाटक आभाळ बघनारे
मतदान केंद्राबाहेर रांगा लावनारे,
जल्लोश यात्रेत गुलाल उडवनारे,
अन् रात्री इमानदारीच्या गुलामगिरिची फळे नुसतिच चाटनारे...
मग मातिची उरली-सुरली नाळ तोडताना
विकासाच्या ओवी गातो
कस्तूरीमृगाच रूप घेतलेला मारिच,
अपहरण होत ते कुरतडलेल्या काळीजाच,
हाती रहात ते शांत लटकलेल बुजगावन,
अन् प्रारब्ध
मागच्या जन्माच व ह्या जन्माच,
पुढच्या जन्मासाठी..


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हम इंसान बन गये..

It's not good bye.. It's see you later..

Atheist having spiritual experience