मुर्तिभंजक

हे मुर्तिभंजका
परत ये
परत ये सहानुभुतीची कुर्‍हाड घेवुन
कमरेत वाकलेल्या, चेहर्‍यात लाचारलेल्या अन् देहाने थकलेल्या
बळीराजाची मुर्ति भंगायला....

हे मुर्तिभंजका
परत ये
परत ये सुडाची तलवार घेवुन
पोटाने पुढारलेल्या, मनाने निर्मम
एका हाताने सलाम अन् दुसर्‍याने हलाल करणार्‍या
श्वेतवस्त्रधारित रानट्यांची मुर्ती भंगायला....

हे मुर्तिभंजका
परत ये
परत ये सद्बुद्धीचा सुरा घेवुन
डोळ्याने आंधळ्या, कानाने बहिर्‍या, तोंडाने मुक्या
अन् स्पर्शाने बधीर असलेल्यांची हतबल मुर्ती भंगायला
अन् निघुन जा कायमचाच

आता मुर्तिकारका तु ये काळ्या कठीण पाषाणासवेत
लाथ मारेल तिथ पाणी काढणार्‍या, लाथाडल तर चिरडणार्‍या
मग बांध बळीराजाच्या मुर्त्या

मुर्तिकारका पुन्हा ये पांढर्‍या ठिसुळ दगडासवेत
रंगाप्रमाणे शुद्ध रहाणार्‍या, डाग पडताच चुरा होणार्‍या
मग बांध श्वेतवस्त्रधारितांच्या मुर्त्या

मुर्तिकारका पुन्हा ये तांबड्या पत्थरासवेत
मरणार्‍याला रक्त देणार्‍या, मारणार्‍याचे रक्त काढणारर्‍या
मग बांध संवेदनशील मुर्त्या

शेवटी प्राणदेवता तु ये
अन् जीव टाक त्या मुर्त्यांमध्ये कोणताही भेदभाव न करता
मुर्त्याही जगतिल भेदाशिवाय
पण पहिला मुर्तिभंजकाला मुर्तिकारकाला प्राण दे
तो जन्मदिनच ठरेल सोहोळा मानवतेचा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हम इंसान बन गये..

It's not good bye.. It's see you later..

Atheist having spiritual experience