12 डिसेंबर

12 डिसेंबर, खर तर एका बाजु ला माजी कृषिमंत्र्याचा वाढदिवस होता तर दुसरी कडे एका शेतकरी नेत्याच (खरतर महाराष्ट्रातला पहिल्या शेतकरी नेता अस म्ह्णल तरी ते वावग नाही ठरणार) निधन झाल होत. आता नक्की करायच तरी काय? कारण साहेबांच्या 75 व्या वाढदिवसाची तयारी तर कधीपासुन चालु असेल. आणि त्यात शरद जोशींचा देहांत... व्हॉट्स-अप्प चे डिपी आणि स्टेटस बदलण्याशिवाय जास्त काही करु पण शकत नव्हते.
शरद पवार हे नाव तर अगदी जन्मापासुन कानावर आदळतय. माझ मुळ गाव शरद पवारांच्या लोकसभा मतदारसंघात येत. हा पण शरद जोशींच नाव मात्र खुप उशिरा कळाल. कदचित 10-11वीत असेन. पश्चिम महाराष्ट्रात ऊस आंदोलन चालु होत. मला सांगलीला, जिल्हाला घरगुती कामातुन जायच होत. तेव्हा सांगलीत ऊस परिषद होती. मी आपल गर्दी आहे म्हणुन घुसलो सभेत. तर शरद जोशी बोलत होते. तेव्हा शरद जोशींनी 2500 रुपये हा दर अमान्य केला होता. आणि खासदार राजु शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच 3000 रुपये दरासाठी आंदोलन चालु झाल होत. तेव्हा पहिलांदा शरद जोशी माहीती झाले. तस लहान असताना शरद जोशी हे नाव ऐकल होत. कधी कधी त्यांची भाषण लावुन रिक्शा गावभर घुमत असायच्या. पण शरद जोशी कळले मात्र त्या दिवशी...
खरतर दोन्ही ‘शरदां’चा कामाचा मार्गही वेगळाच! एकाचा सहाकारी संस्थांवर विश्वास तर दुसर्‍याचा आर्थिक मुक्तीकरण, परकीय गुंतवणुकीचा हट्टाहास होता. मला अजुन आठवतय की FDI ला सगळ्या विरोधी पक्षांनी विरोध केला होता, काही शेतकरी संघटनांचाही विरोध होता. पण मी टिव्ही वर शरद जोशींची मुलाखत बघितली तर त्यांनी स्पष्ट सांगितल होत की जर शेतीत प्रगती करायची असेल तर परकीय गुंतवणुक आवश्य आहे. हा शरद जोशींचा विचारच त्यांना इतर शेतकरी नेत्यापासुन वेगळा करतो. शेतकरी हक्क सर्वसमावेशक बनवण्यात शरद जोशींचा मोलाचा वाटा होता. त्यांनी शेतकर्‍याला आर्थिकदृष्ट्या बिजउत्पादकही बनवला..
सहसा शेतकरी नेता किंवा कामगार नेता म्हणल की तो एक तर साम्यवादी, समाजवादी असतो नाही तर पारंपारीक पद्धतींना चिकटलेला तरी असतो. पण शरद जोशी ह्या चौकटीच्या बाहेरच जावुन विचार करणारे नेते होते. मी इतवर ऐकल की त्यांनी समाजवाद हा शब्द संविधानातुन काढण्याची मागणी लोकसभेत केली होती!
पण हे शेतीच राजकारण ऊस आणि कापुस ह्यांपर्यंत मर्यादित राहील ह्याच थोडस दु:ख आहे
आणि शरद पवार, ह्यांना तर कोणती चौकटच नाही. गरुडाला फक्त आकाश हव असत. मग त्यतली मोकळी जागा शोधुन मनासारख उडन हा त्याचा पिंडच आहे. मी तर शरद पवारांवरच्या टीका फक्त निवडणुकांच्या काळातच ऐकल्यात. निवडणुका झाल्या की साहेब विरोधी पक्षातही असतात आणि सराकारमध्येही. आणि बाकीचे साहेबांची स्तुती करण्यात मग्न असतात. साहेबांनी ‘कुठे कुठे झेंडा’ फडकवलाय हे आता साहेबही विसरले असतील. गमतीचा भाग सोडला तर राष्ट्रवादी ग्रामीण विकासातल योगदान, सहकार क्षेत्रातल योगदान, ग्रामीण आधुनिकीकरणाच योगदान कोणीही नाकारू शकत नाही. पण साहेबांनी कृषीमंत्री म्हणुन ठोस अस काही केल्याच दिसुन येत नाही. माझ मुळ गाव गुरसाळे साहेबांच्या मतदारसंघात आहे. खरतर माण-खटाव हा तसा जन्मत:च दुष्काळी प्रदेश. साहेबांकडुन खुप अपेक्षा होत्या. खर तर शेतकर्‍या उत्पादन घेण्याच स्वातंत्र हवाय. आणि मग त्या मालाला योग्य बाजारपेठ मिळ्वुन देण ही सरकारची जबाबदारी.. मग सरकार, सहकारी तत्वाचा वापर करतय का खाजगीकरणाचा, याच्याशी त्याच काही घेण-देण नाही. पण आता ह्या कृषी उत्पन्न बाजार समितींमुळे आणि अन्न सुरक्षा कायद्यामुळे शेतकर्‍याच्या उत्पादन निवडीवर आणि त्या उत्पादनाच्या बाजारपेठ क्षेत्रांवर मर्यादा आल्यात. पारंपारिक पद्धतीत थोडश्या उत्पादनावर पुरेस उत्पन्न घेणारा शेतकरी, आता जास्त उत्पादन घेण्यास भितोय कारण त्या भरघोस उत्पादनाबरोबर भरमसाठ रिस्कही आलीच ना! त्या भरघोस मालाला जर बाजारपेठ मिळालीच नाही तर? दोष हा व्यवस्थेचा आहे. थोडशी मोकळीक आणि थोडस नियंत्रण हवय. शेतकरी हा इनोवेशन्स करत असतोच. पण घरी पाच तोंड उपाशी असताना तो तर किती प्रयोग करेल?
शेतकरी आत्महत्या करतच आहे. त्याबद्दल दु:ख तर आहेच. पण मग दोष कोणाचा? वाहनचालकांनी रस्त्यातल्या खड्डांना दोष द्यायचा, कंत्राटदाराने कच्चा मालाला, अन् अवेळी पडणार्‍या पावसाला, मग अवेळी पडणार्‍या पावसाच कारण काय तर ग्लोबल वार्मिंग, अन् हे कशामुळे होत तर प्रदुषणाने- मुख्य कारण चालत्या गाड्या! पण हे इतक सोप आहे का? अशावेळी ना तो अ‍ॅडम स्मिथचा इनव्हिजीबल हॉन्ड कामी येतो ना केनच गव्हर्नमेंट इन्टरवेंशन!
असो, साहेब हा प्रश्न नक्कीच सोडवतील अशी अपेक्षा आहे. साहेबांना 75व्या वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा! साहेब शतकपुर्ती करा, आणि तो सोहोळा बघण्यासाठी हा बळीराजा, अन्नदाता भरलेल्या पोटाने, सुखावलेल्या डोळ्याने जिंदा असेल अशी प्रर्थना करतो (तशी तुमच्याकडुन अपेक्षा ठेवतो). महाराष्ट्रात लवकर मध्यवर्ती निवडणुका लागोत, राष्ट्रवादीच सरकार येवो, आणि हा शेतकरी जगो, तोही सन्मानाने. (इतक प्रो-राष्ट्रावादी मी पहिल्यांच बोलतोय...)
आणि शरद जोशींच कार्य, त्यांचा लढा हा शेतकर्‍यांना, सर्वसामान्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या योगदानाला सलाम. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

क्रांती

फुलपाखरु